shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन दिपावलीची जाहिरात मागितली तर न देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते,संघटना, राजकीय नेत्यांची बातमीची येथून पुढे प्रसिद्धी नाही..?



काही (मोजके राजकीय नेते सोडुन) राजकीय व सामाजिक मंडळी वर्षभर पत्रकारांना बातम्या देऊन त्यांचा वापर करून घेतात परंतु दिपावलीची जाहिरात मागितली तर जाहिरातीलाा भरगच्च कारणे सांगतात.. वर्षभर  बातम्या छापायच्या व दाखवायच्या आणि जाहिरात माात्र  द्यायची नाही..! हेेआता कुठवर...! 

मुंबई:- पत्रकारांना बातम्या संकलीत करण्यासाठी प्रवास खर्च मोठा असतो, ते लिहिण्यासाठी किंवा तयार करण्यासाठीही मोठा खर्च येतो. हा खर्च कोणत्याही सर्व सामान्य पत्रकाराला न परवडणारा असतो तरी पत्रकार त्यांचे कार्य अखंडपणे करीत असतात ही खरी वस्तुस्थिती आहे. 


प्रिंट मिडियाला किंवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाला जाहीरातीमधूनच खरे उत्पन्न मिळते. म्हणजेच जाहिरात हा विषयच मिडीयाचा खरा आत्मा आहे. जाहिरात न मिळाल्यामुळे अनेक पत्रकारांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. पण ते मुकाटपणे सहन करून आपले कार्य अखंडपणे चालू ठेवतात. आणि इतरांना प्रसिद्धी आणि पैसे कमावण्यासाठी संधी देतात. म्हणजेच प्रसिद्धी मिळाली म्हणजे त्यांचा काहितरी फायदा होतोच. परंतु सामाजिक,कार्यकर्ते, संघटना, राजकीय नेते याबद्दल पत्रकारांचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार न करता त्यांना जाहिराती न देता. त्यांचा सर्रासपणेे गैरवापर करून घेतात ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारता येत नाही.

राजकारण्यांच्या या धोरणाला कुठेतरी आळा बसला पाहिजे यासाठी ज्या राजकारण्यांनी जाहिरात दिली नाही. त्यांची वर्षभर बातमी छापूच नये. ज्या प्रतिनिधींना (पत्रकारांना) राजकीय जाहिरात मिळाली नसेल त्यांनी जर यापुढे अशा लोकांच्या बातम्या देण्याचे टाळले तर याचा निश्चितच चांगला परिणाम होईल. यासाठी सर्व पत्रकारांनी एकजूट होणे गरजेचे आहे. किमान वर्षभर तरी जाहिरात न देणाऱ्या नेत्यांच्या बातम्या अजिबात छापू नये हीच भूमिका पत्रकार बंधूंनी घ्यावी..व आपली एकजूट कायम ठेवावी...

नाही तर...कुणी येईल......
शब्द कडू आहे पण सत्य आहेत....!
close