shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुरवली- सणसर अपूर्ण अवस्थेत असलेले रस्त्याचे काम पूर्ण करा - शिवसेना इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिले उपअभियंता,सा. बां. उपविभाग भिगवण यांना निवेदन पत्र.

कुरवली- सणसर अपूर्ण अवस्थेत असलेले रस्त्याचे काम पूर्ण करा - शिवसेना इंदापूर तालुकाप्रमुख नितीन शिंदे यांनी दिले उपअभियंता,सा. बां. उपविभाग भिगवण यांना  निवेदन पत्र.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्यातील सणसर कुरवली रस्त्याचे काम खुप दिवसापासुन चालु आहे .सणसर या गावातुन कुरवलीकडे जाताना गावामध्ये दोन्ही बाजुला दवाखाने , मेडिकल तसेच अनेक व्यवसाय धारकांचे त्या रस्त्याला व्यवसाय चालु आहेत . तो रस्ता गेले २ महिन्यापासुन 300 ते ४०० मीटर एवढा लांब व ५ फुट खोल रस्ता खोदुन संबंधीत ठेकेदाराने तसाच ठेवला आहे . त्यामुळे गावातील व परिसरातील रुग्णाचे तसेच सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत तो रस्ता खोदल्याने त्या रस्त्या लगतचे व्यवसाय ठप्प झाले आहेत . त्यामुळे त्या व्यवसाय धारकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे तरी तो रस्ता त्वरीत करण्यात यावा तसेच त्या रस्त्याचे काम चालू असतानाच ! काही ठिकाणी उखडन्यास सुरवात झाली आहे . शासनाने कोटयावधी रुपये रस्त्यासाठी निधी दिला परंतु सबंधित ठेकेदाराने या कामामध्ये पाहिजे त्याप्रमाणात डांबर वापरले नाही. रस्त्याची दबाई केली नाही. लागते त्या प्रमाणात मटेरियल वापरले दिसत नाही. त्यामुळे कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी १ मी बाय १ मी रस्त्याचे मटेरीयल घेवून त्यास वापरलेले डांबर खडी इ . टेस्टींग आपले समोर करावे . तसेच अपुर्ण काम पुर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बील पास करू नये.आशा आशयाचे निवेदन सा.बा.विभाग भिगवण यांना देण्यात आले, या वेळी शहराध्यक्ष महादेव सोमवंशी,रामचंद्र पांचांगणे भिगवण शहर प्रमुख फीरोज शेख उपतालूका प्रमुख , महादेव सकुंडे मदनवाडी शाखा, प्रमुख दता कदम विभाग प्रमुख, सागर डावरे – शिवसैनीक हेमंत भोसले- शिवसैनीक पांडूरंग वाघ – विभाग प्रमुख हे उपस्थित होते.

 या वेळी शिंदे म्हणाले की, सदर कामाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत . सदर कामाची चौकशी करून ठेकेदाराकडुन केलेल्या निकृष्ट कामाबददल सखोल चौकशी करून राहिलेले अपुर्ण काम त्वरीत पुर्ण करण्यात यावे . अन्यथा इंदापुर तालुका शिवसेनेच्या व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने आपल्या कार्यालयावर मोर्चा आणण्यात येईल होणा – या परिणामाबाबत आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी आसे मत शिवसेना इंदापूर तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी निवेदन देऊन व्यक्त केले.
close