shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे यशवंत अभ्यासिका या शैक्षणिक फोरमचे उद्घाटन संपन्न.

इंदापूर येथे यशवंत अभ्यासिका या शैक्षणिक फोरमचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे आय कॉलेज समोर पवार बिल्डिंग मध्ये सनी पवार यांनी इंदापुरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी एक सुख सुविधा युक्त अभ्यासिका उभारली असून सदर यशवंत अभ्यासिका चे उद्घाटन सोमनाथ माने सर यांच्या हस्ते दिनांक ९ नोव्हेंबर २०२१ रोजी संपन्न झाला. यावेळी घनश्याम गवळी, महेश नवले ,काका पाटोळे, विठ्ठल नलवडे, महेशराज शेख ,सिद्धेश्वर गुरव व विद्यार्थी सभासद उपस्थित होते.
या कार्यक्रमा प्रसंगी उद्घाटक सोमनाथ माने म्हणाले की, विद्यार्थ्यांनी रूपरेषा आखून अभ्यासाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. कार्य पद्धत बदलली तरी चालेल परंतु तत्त्व बदलता कामा नये. स्पर्धा परीक्षेची वास्तवता जाणून अभ्यासाची गती वाढवावी पुणे यासारख्या सुख-सुविधा ग्रामीण भागात अभ्यासिकेद्वारे सनी पवार यांनी उपलब्ध करून दिल्या ही कौतुकाची बाब असून त्याचा फायदा विद्यार्थी पालक यांनी घ्यावा. या अभ्यासिकेत अभ्यास करून यशस्वी गुणवंत गडले त्यांनी अभ्यासिकेचे नाव उंचावले अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या उद्घाटन समारंभाच्या वेळी महेश नवले, विठ्ठल नलवडे, काका पाटोळे, विकी चौगुले, पंढरीनाथ कचरे ,घनश्‍याम गवळी इत्यादी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व अभ्यासिका शुभेच्छा दिल्या.
या समारंभात यशवंत यशस्वी सभासद असणारे १)विकास आबा निकम,२)  किरण गजानन मदने, ३) सोमनाथ राजेंद्र सिद,  ४)सचिन दादासो देवकर ५) पप्पू भगवानसो आरडे( एस. आर. पी. एफ .)मध्ये निवड झाल्याने त्यांचा झाडे देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सनी पवार सर यांनी केले तर आभार यांनी केले.
close