shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साळेगाव जवळ कार मोटरसायकलचा अपघात : दोन जागीच ठार तर दोघे जखमी..!!

प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधी  :--

केज तालुक्यातील साळेगाव येथे केज-कळंब रस्त्यावर पहाटे ६:०० वा. च्या दरम्यान मोटार सायकलला एका कारने दिलेल्या धडकेत मोटरसायकल स्वारांसह गाडीचा चालक ठार झाला असून मोटरसायकल वरील एक महिला व लहान मुलगा हे गंभीर जखमी झाला आहे.











या बाबतची माहिती अशी की, दि. १० नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ६:०० वा. च्या दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेता जवळच्या पुलावर एका बलॅनो गाडीने क्र. (एमएच-२५/एएस-७५९०) ने प्रथम पुलाच्या कठड्याला धडकली. नंतर समोरून येणाऱ्या मोटार सायकलला क्र. (एमएच-४४/वाय-२१५३) समोरून धडक दिली. यात मोटार सायकल वरील अमोल पांडुरंग सत्वधर वय (२४ वर्षे) रा. केज आणि कार चालवीत असलेला युवक अमित जीवन बाराते वय १७ वर्ष रा. कळंब हे दोघे जागीच ठार झाले. तर मोटार सायकलवरील सौ. अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर वय (५ वर्ष) दोघे रा. नारायणगाव जि. पुणे हे दोघे जखमी झाले आहेत. 

हा अपघात एवढा भयंकर होता की, कार प्रथम पुलाच्या कठड्याला धडकून मोटार सायकलला धडकली व नंतर त्याने मोटारसायकलला धडक दिली. त्या नंतर ती कार अनेक वेळा पलटी खाल्ल्या असल्याने कार चकनाचूर होऊन अमित बाराते याचे प्रेत गाडीच्या बाहेर फेकले गेले.

जखमी अनुराधा विनोद फुलसुंदर यांच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत. तर त्यांचा लहान मुलगा चि. आदित्य विनोद फुलसुंदर याचा एक पाय कापला असून त्यांच्यावर लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, महादेव गुजर, रुक्मिणी पाचपिंडे, अशोक गवळी, गायकवाड, शिनगारे, रमेश सानप, दिलीप गित्ते, हनुमंत गायकवाड, बाळासाहेब अहंकारे, शेख अनिस मतीन, अशोक नामदास हे सर्व पोलीस कर्मचारी हजर झाले. तसेच रुग्णवाहिका चालक घुले व ग्रामस्थ यांनी मदत केली.


close