shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धक्कादायक ! शववाहिका ट्रकवर धडकली ; १७ जणांचा मृत्यू..!!

एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१

धक्कादायक ! शववाहिका ट्रकवर धडकली ; १७ जणांचा मृत्यू..! !

कोलकाता : पश्चिम बंगालमधील नादिया येथे एक पार्थिव घेऊन जाणारी शववाहिका रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर धडकल्याने घडलेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला ! या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून घटनास्थळी मदतकार्य केले.
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातून काही जण मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते. यावेळी वाहनात 20 हून अधिक लोक असल्याचे सांगण्यात येते. मृतदेह नेणारी गाडी हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. मृतदेह घेऊन जाणारे वाहन भरधाव होते. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा आणि तो वेगात जाऊन ट्रकला धडकला असावा.

ट्रक आणि वाहन यांच्यात झालेल्या धडकेनंतर परिसर कानठळ्यांनी दुमदुमला. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. पंधरा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातातील काही जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close