shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल तालुका शिवसेनेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी अभिवादन..!

एरंडोल:- येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
    एरंडोल तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख वासुदेव पाटील जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी "बाळासाहेब ठाकरे अमर रहे" शिवसेना जिंदाबाद अशा घोषणा दिल्या.
उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी गांधी निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी युवा सेनेचे तालुकाप्रमुख बबलू पाटील युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, उपनगराध्यक्ष कुणाल महाजन विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, उपतालुका प्रमुख रवींद्र चौधरी, चिंतामण पाटील, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, सुभाष मराठे, अमोल भावसार, परेश बिर्ला, कुणाल पाटील,प्रवराज पाटील, कृष्णा ओतारी, विठ्ठल आंधळे, चंदू जोहरी, यांचेसह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

प्रतिनिधी प्रमोद चौधरी

close