shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यातील लाखा येथे मांजरा पात्रात सपोनि वाघमोडे यांची अवैद्य वाळू उपशावर कार्यवाही..!!



--------------------------------------------------

 प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-


 केज तालुक्यात लाखा येथील मांजरा नदी पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपशावर केज पोलीसांनी मध्यरात्री धाड टाकून एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर ताब्यात घेत मोठी कार्यवाही केली आहे.




या बाबतची माहिती अशी की, दि. १६ नोव्हेंबर मंगळवार रोजी रात्री ८:३० वा. च्या दरम्यान केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी केज तालुक्यातील लाखा येथे मांजरा नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांच्या पथकाने धडक कार्यवाही केली. यावेळी त्यांना नदीपात्रात वाळू उपसा करीत असलेले एक जेसीबी व तीन ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहेत. या कार्यवाहीत साहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख अनिस, यांच्यासह अशोक नामदास, धनपाल लोखंडे, अशोक थोरात, अमोल गायकवाड आणि अनिल मंदे हे पथकात सहभागी झाले होते. पोलिसांनी एक जेसीबी व ३ ट्रॅक्टर केज पोलीस ठाण्यात अणून ताब्यात घेतले आहेत. केज पोलिसांच्या विशेष पथकाच्या धडाकेबाज कार्यवाहीमुळे केज परिसरात होत असलेल्या अवैद्य वाळू उपसा करणाऱ्या  वाळू माफियामध्ये खळबळ माजली आहे.

close