शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २० नोव्हेंबर २०२१
प्रतिनिधी : मोदी सरकारने जेव्हा पासून तीन कृषी कायदे आणले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या मनात संतापाचे वातावरण होते. खूप विरोध या वेळी झाला.
मागील वर्षभरापासून या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होत. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे,
या शब्दांत अमित शाह यांनी कौतुक केले आहे. केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेची विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी यासाठी ‘गुरुपूरब’ हा खास दिवस निवडला.
त्याच्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, हेही यातून दिसून येते. त्यांनी अप्रतिम मुत्सद्देगिरी दाखवली आहे, असे ट्विट अमित शाह यांनी म्हटले आहे.
केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा देशाचे अन्नदाते, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची असलेली संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते,
असे ट्विट केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी करत या निर्णयाला पाठिंबा दर्शवला. दरम्यान, मोदी सरकारने जेव्हा पासून तीन कृषी कायदे आणले तेव्हापासून शेतकऱ्यांच्या मनात संतापाचे वातावरण होते.
खूप विरोध या वेळी झाला. मागील वर्षभरापासून या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे प्रतिनिधी )📲7350591600

