shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिंगवेनाईक शिवसेना शाखेच्या अध्यक्षपदी शेळके तर उपाध्यक्षपदी जाधव यांची निवड


प्रतिनिधी : रवि भगत

शिंगवेनाईक : १९ / नगर तालुक्यातील शिंगवे नाईक युवा सेना शाखा अध्यक्षपदी किरण नंदकुमार शेळके यांची व उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर सुभाष जाधव यांची आणि इस्लामपुर युवा सेना शाखा अध्यक्षपदी सोन्याबापु निकम व उपाध्यक्ष पदी डॉ. संतोष बाचकर यांची नियुक्ती  करण्यात आली.

 यावेळी त्यांना नियुक्तीचे पत्र देताना शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत व युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण गोरे आणि गावचे मा सरपंच माननीय विश्वास तात्या जाधव व शिंगवे नाईक शिवसेना शाखा प्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते .

 त्यांच्या भावी वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या .
close