प्रतिनिधी : रवि भगत
नगर : १९ / नगर तालुक्यातील दहिगाव येथील भिमराज किसन म्हस्के (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुलं ,एक मुलगी, सुना,जावई , नातवंडे असा मोठा परिवार आहे. दहिगाव येथील सरपंच मधुकर मुरलीधर म्हस्के,व श्रीराम ट्रस्टचे अध्यक्ष अन्शाबापु रेवजी म्हस्के यांचे ते चुलते होते . सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार शिवा म्हस्के यांचे आजोबा होते.दशक्रिया विधी रविवारी (दि.२८)रोजी दहिगाव येथे होणार आहे.

