शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२१
प्रतिनीधी : महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक विषय ज्वलंत आहेत. त्यापैकी महत्वाचे म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांचा संप.
मागील अनेक दिवसांपासून हा संप सुरु आहे. यात मुंबईच्या आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांसारखे नेतेही येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे हा विषय सध्या महाराष्ट्रासाठी अत्यंत ज्वलंत झाला आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अर्थमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात तब्बल चार ते साडे चार तास मिटिंग झाल्याचे समजते.
त्यावेळी शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर अनिल परब यांना महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती आज समोर आली आहे.
शरद पवारांच्या नेमक्या सूचना काय?
-एसटी कर्मचाऱ्यांना घसघशीत पगारवाढ द्या
-पगारवाढ देताना अगदी कनिष्ठ स्तरावरील कर्मचारी ते वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळावा
-पगारवाढीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर जो आर्थिक ताण पडेल, त्यासाठी अर्थमंत्र्यांनी वर्षभराची तरतूद करावी
-आर्थिक भार सोसावा लागेल तरी चालेल पण भरघोस पगारवाढ द्या
याबाबतीत शरद पवार आणि संजय राऊत यांमध्ये देखिल खलबते झाले. यावेळी राऊत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

