shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोठ्या माणसांना किंवा सफेद कपडेवाल्यांना केलेली मदत ते विसरतील मात्र झोपडीतील माणसे तुला विसणार नाहीत - ना. भरणे.

मोठ्या माणसांना किंवा सफेद कपडेवाल्यांना केलेली मदत ते विसरतील मात्र झोपडीतील माणसे तुला विसणार नाहीत - ना. भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:  रक्ताचा तुटवडा असल्याची गरज ओळखून आपले मेंबर मित्र परिवाराने अनिल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टसोहळा चिंतन दिनी रक्तदान शिबिर आयोजित करून सुंदर असा उपक्रम राबवला. यावेळी, आण्णा तुला एकचं सांगतो आयुष्यात काम करताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मान.त्या माणसाला योग्य वेळी केलेली मदत ते कधीच विसरत नाहीत.तु मोठ्या माणसांना किंवा सफेद कपडेवाल्यांना केलेली मदत ते विसरतील मात्र झोपडीतील माणसे तुला विसणार नाहीत.अशा शब्दात दत्तात्रय भरणे यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल पवार यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या .

उच्चशिक्षण युवा कार्यकर्ते अनिल पवार यांच्या वाढदिवसा निमित्त शहरातील वडारगल्ली मध्ये आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने रविवार दि.७ रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबीरास सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली या प्रसंगी ते बोलत होते.

मंत्री भरणे म्हणाले की,तुझ्या कामाचा झपाटा आहे,तुला कामाची खूप आवड आहे.आयुष्यात मिळालेल्या संधीचे योग्य वेळी सोनं करा.त्यामुळे तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. चांगले काम करणाऱ्या माणसाला त्रास होतोचं.विरोधकांनी रस्त्यात खिळे जरी पेरले तरीदेखील ते पार करुन जाण्याची इच्छाशक्ती आपल्याकडे असायला हवी. काळ कोणासाठी थांबत नसतो.

समाजात काम करताना एखादे काम झाले नाही तरी चालेल पण काम घेऊन येणाऱ्या माणसाला आपण त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याची जाणीव होयला हवी.जी चांगली माणसं काम करतात त्याला अडथळे येतातचं.मात्र ते पार करुन जावे लागते.दिसतं तसं नसतं म्हणूनचं जगं फसतं ! उद्याचं इंदापूर,उद्याचं राज्य घडवण्याचं काम हे युवकांच्या हातून होणार आहे. चांगल्या माणसाला चांगल्या विचाराला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
close