शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२१
देवळाली प्रवरा : देवळाली बाजारतळ या ठिकाणी असलेल्या पोस्ट ऑफिस लाइन दुकान गळ्यांच्या वरच्या मजल्यावर सुरु असलेल्या नगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामावरील बांधकाम कर्मचारी बाळासाहेब कोहकडे (रा. उक्कालगाव) वय अंदाजे 50 वर्ष हे काम करत असताना दि. २४ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजनेच्या सुमारास खाली पडून गंभीर जखमी झाले.
देवळाली येथील साई प्रतिष्ठान च्या रुग्णावहिकेत त्यांना राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटल येथे दाखल केले असून देवळाली प्रवरा हेल्प टीम चे अप्पासाहेब ढूस, प्रशांत कराळे, ऋषिकेश संसारे आदींनी तातडीने रुग्णालयात कोहकडे यांची भेट घेऊन विचारपूस केली.
चंद्रकांत बोराडे, रवी देवगिरे यांनी रुग्णाला तातडीने रुग्णालयात हलविणेत मदत केले बद्दल देवळाली हेल्प टीमच्या सदस्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

