shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एस टी कर्मचारी यांच्या संपाला इंदापूर येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचा जाहीर पाठिंबा.

एस टी  कर्मचारी यांच्या संपाला इंदापूर येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंटचा जाहीर पाठिंबा.
         इंदापूर प्रतिनिधी:(दिनांक १६ नोव्हेंबर २०२१) रोजी  इंदापुर  येथे एसटी कर्मचारी यांचे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन चालू असून सदरील आंदोलनास असलम शेख महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट इंदापुर तालुका अध्यक्ष व अनिशा सय्यद महीला तालुका अध्यक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिला. 
        राज्यात विविध ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाच्या कामगार विरोधी धोरणास वैतागून स्वतःचे जीवन संपवले आहे. राज्य शासन व विरोधी पक्ष हे मात्र एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळत असून त्यांच्या धोरणामुळे एस टी कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. 
      तरी शासनाने महामंडळास  बरखास्त करून कर्मचारी यांना राज्य शासनात विलीनीकरन करावे व तसेच आत्महत्या करणाऱ्या कुटुंबास ५० लाखाची मदत करावी. अशी मागणी महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. 
        यावेळी असलम शेख इंदापुर तालुका अध्यक्ष मुस्लिम फ्रंट, अनिशा सय्यद इंदापुर महीला तालुका अध्यक्ष इतर कर्मचारी उपस्थित होते.
close