प्रतिनिधी : आसावरी वायकर
उक्कडगाव : १६ / नगर तालुक्यातील उक्कडगाव येथील उक्कडगाव -सांङवे रोङवरील विहिरीत आज दुपारी बाराच्या सुमारास विषारी साप विहिरीत पङला होता .
दुपारच्या सुमारास शेतकरी महादेव तिपुळे विहिरीवर मोटर चालु करण्याकरिता गेले असता विहिरीत साप जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता . यावेळी महादेव तिपुळे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबु तिपुळे यांनी ग्रामस्थांना बोलवून सापाला विहिरीतुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता साप बाहेर काढण्यास अपयश आले . ग्रामस्थांनी सर्प मित्र शुभम कांबळे यांना फोन द्वारे माहिती दिली असता सर्प मित्र यांनी येवून सुमारे चार वाजता त्यांच्या युक्तीने साप बाहेर काढला व त्याला जंगलात सोङुन जीवनदान दिले .
यावेळी ग्रामस्थ गुणा कांबळे, अक्षय तिपुळे ,चांगदेव तिपुळे, शुभम कांबळे ,ओम तिपुळे, सचिन म्हस्के आदी ग्रामस्थांनी प्रयत्न केले.

