shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भीमा च्या कर्मचाऱ्यांना राजवर्धन पाटील यांचेकडून मिठाई देऊन दीपावलीच्या शुभेच्छा - कारखान्यामध्ये येऊन दिल्या शुभेच्छा

निरा भीमा च्या कर्मचाऱ्यांना राजवर्धन पाटील यांचेकडून मिठाई देऊन दीपावलीच्या शुभेच्छा 
 - कारखान्यामध्ये येऊन दिल्या शुभेच्छा
फोटो :- नीरा भीमा कारखान्यावरती राजवर्धन पाटील यांनी कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या

इंदापूर :प्रतिनिधी दि.4/11/21 
           शहाजीनगर येथील निरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना संचालक राजवर्धन पाटील यांनी गुरुवारी (दि.5) सकाळी कारखान्यामध्ये येऊन दीपावली निमित्ताने मिठाई देऊन शुभेच्छा दिल्या. 
               नीरा भीमा कारखान्याचा  21 वा ऊस गळीत हंगाम सध्या उत्कृष्टपणे चालु आहे. सध्या दीपावलीचा सण असूनही शिफ्टमध्ये कर्मचारी जबाबदारीने आपले कर्तव्य बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांना राजवर्धन पाटील यांनी कारखान्यात येऊन दीपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांचेशी संवाद साधला. राजवर्धन पाटील यांनी अनपेक्षितपणे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी येऊन दिलेल्या शुभेच्छांमुळे झालेला आनंद कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. याप्रसंगी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
______________________________
.
close