शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२१
वांबोरी : अहमदनगर जिल्ह्यातील आणि राहुरी तालुक्यातही सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेली “वांबोरी” ग्रामपंचायत हि नेहमीच तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिह्याभर राजकीयदृष्ट्या,विकासकामा बाबत, कायमच चर्चेत असते राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या माधमातून अनेक प्रलंबित कामे मार्गी लागलेले आहेत,
“वांबोरी” ग्रामपंचायत येथे आज दीपावली पाडव्याच्या शुभमुहर्त निमित्ताने जिल्ह्यातील सर्वात मोठी वांबोरी ग्रामपंचायत मधील जवळपास ५७ कर्मचार्यांना आज माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे यांच्या शुभहस्ते गणवेश आणि दोन महिन्यांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
"गणवेश आणि दोन महिन्यांचे सानुग्रह अनुदान वाटप प्रसंगी सर्वच कर्मचारी उपस्थित होते आपली दीवाळी गोड झाली असल्याने आमचा आनंद द्विगुणीत झाला आहे यापूर्वीही आमचे कामकाज हे नेहमीच चोख आणि काटेकोरपणे आम्ही करत होतोच आमच्यावर असलेली जवाबदारी व्यवस्थितरित्या सांभाळत आहे."
वांबोरी ग्रामपंचायत कर्मचारी
यावेळी वांबोरी येथील सरपंच किरण ससाणे, उपसरपंच सौ.मंदाताई भिटे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे,माजी सरपंच किसनराव जवरे, माजी उपसरपंच मोरे भाऊसाहेब, माजी उपसरपंच पोपट देवकर, ऋषिकेश मोरे, माजी ग्रामपंचायत सदस्य शितल मकासरे,शंकरराव मोरे, ईश्वर कुसमुडे, रवि पटारे, बंडु पटारे,बंटी वेताळ,महेश साळुंके, भिवा मांगुर्डे , संजय मोरे, अशोक मांगुर्डे अशोक पटारे, सुरज वाघ ,संजय नागदे, बाबासाहेब तोडमल,सोमनाथ गडाख, संभाजी गडाख,बाप्पुराव गडाख,राम काळे, अन्शाबापु गडाख,आदी नागरिक व कर्मचारी यांच्या उपस्थित गणवेश आणि दोन महिन्यांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.
वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट वतीने दिपावली निमित्ताने
कोरोना संक्रमित कुटुंबीयांना व विधवा महिलांना अन्नधान्य, रेशन कीट चे वाटप .....
दीपावली निमित्ताने काल ०४ नोव्हेंबर गुरुवार रोजी वांबोरी ग्रामपंचायत कार्यालयात वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट वतीने दिपावली निमित्ताने
कोरोना संक्रमित कुटुंबीयांना व विधवा महिलांना अन्नधान्य, रेशन कीट चे वाटप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटेसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच किरण ससाणे, उपसरपंच सौ.मंदाताई भिटे, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या शालु गायकवाड, शुभम वाघ ,वांबोरी गणातील सविता मंडलिक,ग्रा.पं.सदस्य ईश्वर कुसमुडे,बंडु पटारे, ज्ञानदेव गवते स्वप्निल मंडलिक,राम काळे,यांच्या सह मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

