shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढत्या इंधनाच्या किमती व दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण पाहता या इलेक्ट्रिक स्कूटर काळाची गरज - ना. भरणे.इंदापुर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डबलसीट इलेक्ट्रिक स्कूटर वरुन मारला फेरफटका.

वाढत्या इंधनाच्या किमती व दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण पाहता या इलेक्ट्रिक स्कूटर काळाची गरज - ना. भरणे.

इंदापुर येथे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डबलसीट  इलेक्ट्रिक स्कूटर वरुन मारला फेरफटका.

इंदापूर प्रतिनिधी: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे यापूर्वी सायकल स्वारी करताना  पाहिले होते परंतु   आज इंदापूर शहरातून ना. भरणे यांनी स्कूटी वरून फेरफटका मारत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

इंदापूर बँक आँफ इंडिया परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या लकी इलेक्ट्रिक बाईक या शोरुमचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर उद्घाटन शुक्रवार दि.०५ नोव्हेंबर रोजी पार पडले.यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी इलेक्ट्रिक स्कूटी वरुन फेरफटका मारला.


 
दत्तात्रय भरणे हे नेहमी त्यांच्या सर्वसामान्यांत मिसळून वागण्याच्या स्टाईल मुळे चर्चेत येतात.आजही त्यांनी या शोरुमच्या उद्घाटना नंतर इंदापूर नगरपरिषदेचे विरोध पक्षनेते पोपट शिंदे यांना मागे बसवून स्वतः ड्राईव्हींग करीत या नव्या  इलेक्ट्रिक स्कूटर वरुन फेरफटका मारत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

वाढत्या इंधनाच्या किमती व दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रदूषण पाहता या इलेक्ट्रिक स्कूटर काळाची गरज असून त्या वापरासाठी सोईस्कर आहेत. वाजवी दरात त्या आता इंदापूर मध्ये उपलब्ध झाल्या असून इंदापूरकरांनी ही त्या दृष्टीने पावले टाकावीत असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे
close