shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्त शेतकरी करणार मुंबईत सामुहिक आत्मदहन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर , २०२१
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे उर्वरित प्रकल्पग्रस्त उमेदवारांना त्वरित सेवेत सामावून न घेतल्यास मुंबईत मंत्रालयासमोर सामुहिक आत्मदहन करणार असल्याचे विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकरी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे सन १९६८ साली स्थापन झाले. त्यावेळी राहुरी तालुक्यातील खडांबे, सडे, वरवंडी, डिग्रस, प्रिंप्री अवघड, राहुरी खुर्द या सहा गावातील ५८४ खातेदारांच्या २८४८.८८ हे. जमिनीचे संपादन करून हे विद्यापीठ स्थापन करण्यात आले. आज रोजी सदर विद्यापीठास ५१ वर्षे पूर्ण होऊन गेले आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने घेऊन शेतकऱ्यांना त्याच्या वारसांना विद्यापीठ मध्ये नोकरी देण्याची तरतूद असताना ही आजही काही प्रकल्पग्रस्त नोकरीच्या आशेवर आहेत. प्रकल्पग्रस्तांनी विद्यापीठ प्रशासनास निवेदने दिली, मंत्रालयीन प्रशासनास देखील वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. तरीही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close