shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महेंद्रदादा रेडके यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त इतर खर्च टाळून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दिले एसटी कामगार यांना किराणा कीट व वृक्ष भेट. आश्रमशाळा या ठिकाणी खाऊ व फळे देऊन तेजपृथ्वी ग्रुपने महेंद्रदादा रेडके यांचा अभिष्टचिंतन दिन व बालदिन केला साजरा.

महेंद्रदादा रेडके यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त इतर खर्च टाळून तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने दिले एसटी कामगार यांना किराणा कीट व वृक्ष भेट.

  आश्रमशाळा या ठिकाणी खाऊ व फळे देऊन तेजपृथ्वी ग्रुपने महेंद्रदादा रेडके यांचा अभिष्टचिंतन दिन व बालदिन केला साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्र यांच्या वतीने महेंद्रदादा रेडके यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त इतर खर्च टाळून एसटी कामगारांच्या दुःखात सहभागी  होत अभिष्टचिंतनाला लागणारा खर्च हार ,फेटे, केक हे सर्व टाळून एसटी कामगार आठ दिवसापासून इंदापूर एसटी डेपो च्या समोर बसले आहेत. काही कामगार निलंबित केले आहेत. त्यामुळे त्यांच्या दुःखात सहभागी होऊन रेडके यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त तेजपृथ्वी ग्रुपने या कर्मचाऱ्यास(दि.१४ नोव्हें) रोजी येथुन पुढे लागणारे किराणा साहित्य व वृक्षारोपण करण्यासाठी वृक्ष भेट दिले. 
यावेळी बोलताना तेजपृथ्वी ग्रुपचे मार्गदर्शक नानासाहेब खरात म्हणाले की, महेंद्रदादा यांचा वाढदिवस न करता आम्ही आपणास आज दादांच्या वाढदिवसानिमित्त हे सर्व चार ते पाच दिवस पुरणारे किराणा किट भेट देत आहोत.तसेच तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून इंदापुर आगार येथील एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले.
 तसेच दादांच्या मार्गदर्शनाखाली येथून पुढे तेजपृथ्वी ग्रुप एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांच्या पाठपुरावा करण्यासाठी आपल्याबरोबर असेल. १७ तारखेच्या आत जर कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर पांडुरंगतात्या मारकड व महेंद्रदादा रेडके  यांच्या मार्गदर्शनाखाली तेजपृथ्वी ग्रुप रस्त्यावर उतरणार आहे .
यावेळी मार्केट कमिटीचे माजी उपसभापती पांडुरंग मारकड, तेजपृथ्वी ग्रूपचे उपाध्यक्ष गणेश शिंगाडे, सरपंच सुभाष बोंगणे, नितीन झेंडे, गोकुळ कोकरे, मोरेश्वर कोकरे, महेश शिंदे ,संतोष कुंभार ,सुधीर पाडुळे ,हनुमंत यमगर इतर तेजपृथ्वी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

तसेच महेंद्रदादा रेडके यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त    श्रावणबाळ आश्रम शाळा येथे मुलांना फळे वाटप करण्यात आले व त्यांना बाल दिनाच्या ही शुभेच्छा देण्यात आल्या.
close