shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला अपघात ग्रस्तांना धीर..पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर जवळ घडला होता अपघात.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला अपघात ग्रस्तांना धीर..पुणे- सोलापूर महामार्गावर लोणी देवकर जवळ घडला होता अपघात. 
इंदापूर प्रतिनिधी:लोणी देवकर जवळ पुणे सोलापूर हायवेवर एक कार रस्ता सोडून समोरच्या दुभाजकावर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे  भिगवन वरून इंदापूर दिशेकडे आपल्या शासकीय ताफ्यासह जात असताना त्यांच्यासमोर ही घटना(दिनांक १४ नोव्हेंबर) रोजी घडली होतो. त्यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेकडे गाडी थांबून धाव घेतली आणि त्या अपघातग्रस्त यांना धीर दिला.अपघातग्रस्त कार मध्ये दोन प्रवासी होते.त्यांना गंभीर दुखापत झाली नव्हती मात्र जोरदार मार लागला होता. शिवाय ते दोघे प्रचंड घाबरलेले होते.मंत्री भरणे यांनी त्यांच्याजवळ जावून त्यांना या अपघातातून सावरण्यासाठी धीर दिला. त्याची विचारपूस केली.गाडीतील पिण्याचे पाणी देऊन घाबरु नका मी सोबत आहे. काही होणार नाही असं ही बजावल.तुम्हाला इतर काही मदत लागत आहे का? आम्ही आहोत तुमच्यासोबत असं म्हणून भरणे यांनी त्याच्यातील माणुसकी दाखवून दिली. त्यानंतर ना भरणे पुढील दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले.


रस्त्यावर अनेक वेळा अपघात घडतात. अशा वेळी मदतीला धावणारे थोडे असतात. जो तो लाबूनचं हात जोडतो आणि निघून जातो. मात्र अशा वेळी अपघातग्रस्तांना मदत केली तर त्यांचे प्राण वाचू शकतात. शासन देखील अपघात ग्रस्ताग्रस्तांना मदत करा म्हणून जनजागृती करताना आपण पाहत आहोत. आज एका सरकारच्या मंत्र्यानेच अपघात ग्रस्तांना मदत केल्याने त्याच्यातील माणुसकीचे दर्शन तर झालेच शिवाय यातून अनेकांना प्रेरणा ही मिळाली.
close