shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राळेगण सिद्धी ठिकाणी आयोजित शिबिरा संदर्भात इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ची बैठक संपन्न.

राळेगण सिद्धी ठिकाणी  आयोजित शिबिरा संदर्भात इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ची बैठक संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ची बैठक ग्रामपंचायत कार्यालय कळंब मध्ये (१४ नोव्हेंबर) रोजी पार पडली.
यावेळी तालुका संघटक जनार्धन पांढरमिसे , जेष्ठ  सामाजिक कार्यकर्ते भजनदास पवार,  खजिनदार अनिल चितळकर, इंदापूर शहर संघटक  प्रशांत भानुदास शिताप, सहसंघटक लक्ष्मण गडदेसर,तालूका सहसंघटक शामराव केशव जाधव, इंदापूर तालूका सचिव महेश  मोहिते व नौशाद पठाण मॕडम ऊपस्थित होते .
 यामध्ये २४ तारखेला राळेगण सिद्धी ठिकाणी शिबिर आयोजित केलेला आहे या शिबिरासाठी  जास्तीत जास्त कार्यकर्त्यांची संख्या कशी वाढेल यावर ती चर्चा झाली व इंदापूर तालुक्यातून जास्तीतजास्त कार्यकर्ते यावेत या उद्देशाने सर्वांनी प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे .यासाठी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शिबिरासाठी जास्त संख्या कसे वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे. गुरुवारपर्यंत नावाची यादी तयार करणे अपेक्षित आहे. त्यानंतर आपणा सर्वांना कशा पद्धतीने जायचं आहे. यासाठी व्यवस्था करण्यासाठी सगळ्यांनी नावांची यादी तालुका सहसंघटक जनार्धन पांढरमिसे  व शहर संघटक प्रशांत शिताप  यांच्याकडे पाठवीणे आवश्यक आहे.
close