कर्तुत्वाच्या जोरावर देशासाठी योगदान देणाऱ्या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्थान आजही युवकांच्या हृदयात कायम : हर्षवर्धन पाटील
इंदापूर प्रतिनिधी:आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कालखंडातील इतिहास पाहिला तर खूप मोठी ऐतिहासिक क्रांती त्या कालखंडात त्यांनी घडवली.आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये महत्त्वपूर्ण व भरीव योगदान देणाऱ्या देशासाठी वाहून घेणाऱ्या क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव २२७ वर्षांनंतर आजही युवकांच्या हृदयात आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी (दि.१४)केले.
आद्यक्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्ताने जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ललेंद्र शिंदे व त्यांच्या सहकऱ्यांनी रविवार दि.१४ नोव्हेंबर रोजी इंदापूर शहरातील साठेनगर मध्ये क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भव्य रक्तदान शिबिर व सत्यशोधक लोकशाहीर डाॅ.अण्णाभाऊ साठे वाचनालय या ठिकाणी शैक्षणिक पुस्तक वाटप कार्यक्रम हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडला. तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पार पडला.यावेळी ते बोलत होते.
जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ललेंद्र शिंदे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करून त्यांचा सन्मान केला.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका छोट्याश्या गावात झाला. एका छोट्याश्या गावात जन्म झालेल्या या युवकाने खूप मोठी क्रांती केली.महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे भरीव मोठे काम आहे.म्हणून त्यांना वस्ताद,वीर आणि शूर असे संबोधण्यात येते.ही सर्व नांवे त्यांना त्यांच्या कर्तुत्ववाने मिळाली आहेत.म्हणूनच २२७ वर्षानंतर ही आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे नांव प्रत्येक युवकांच्या हृदयामध्ये आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या युगात व त्यानंतरच्या कालखंडात इंग्रजांच्या विरोधात लहुजी वस्ताद साळवे यांनी खूप मोठा लढा दिला.याचसोबत एक वेगळ्या प्रकारचे सैन्य निर्माण केले.
पाटील पुढे म्हणाले, जयंती उत्सव समितीचे आयोजक ललेंद्र शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक सप्ताह भराचे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. चांगले उपक्रम जयंती उत्सव निमित्ताने घेतले आहेत.
कार्यक्रमास इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, नगरसेवक भरत शहा,भाजपाचे ओबीसी तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे,शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद,इंदापूर नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम,सोलापूर जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,इंदापूर तालुकाध्यक्ष संतोष आरडे,पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ.स्वाती आरडे,भारतीय जनता पार्टी अनुसूचीत जाती मोर्चाचे सचिन आरडे,शिवधर्म फाउंडेशनचे दिपक काटे,राष्ट्रवादी युवकचे इंदापूर शहर कार्याध्यक्ष मयूर ढावरे,दलित स्वयंसेवक संघाचे शहराध्यक्ष उमेश ढावरे,लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय जगताप , शिवसेनेचे संजय खंडाळे, नंदू खंडाळे उपस्थित होते.

