महाराष्ट्रातील सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या अडचणीबाबत शासनाकडे पाठपुरावा करू - प्रदिप गारटकर.
श्रीनाथ पाणी पुरवठा सहकारी संस्था वडापुरी ची वार्षिक सर्वसाधारन सभा संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील सहकारी पाणीपुरवठा संस्थांना यापुढे ज्या अडचणी निर्माण होतील त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू असे श्रीनाथ पाणी पुरवठा सहकारी संस्था वडापुरी ची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १४ नोव्हेंबर रोजी वडापुरी तोबरे वस्ती या ठिकाणी पार पडली त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना आश्वासित केले.
वडापुरी भागातील शेतकऱ्यांची जलवरदायिनी असणारी १९८७ साली सुरू करण्यात आलेली श्रीनाथ पाणी पुरवठा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारन सभा दि.१४ नोव्हेंबर २०२१ रोजी कोरोना काळातील नियमाचे पालन करून पार पडली.
यावेळी पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी चेअरमन हनुमंत जगताप, श्रीनाथ सोसायटीचे चेअरमन किसन सावंत, संस्थेचे उपाध्यक्ष हरिदास माने, सांगलीचे इंजिनियर कुंभार, पीडीसी बँकेचे घोलप, फडतरे , भाळे, दादासाहेब जगताप ,शरद सावंत, बापू मेहेर, बाळासो सुर्वे, धनंजय फडतरे, किशोर देवकर इत्यादी संचालक व सभासद उपस्थित होते.
सर्वसाधारण सभेत प्रदीप गारटकर म्हणाले की,श्रीनाथ पाणी पुरवठा सहकारी संस्था१९८७ साली सुरु झाली. त्यावेळी आधुनिक साधन सामग्री उपलब्ध नव्हती. दहा किलोमीटर पाणी आणून एक हजार एकर शेती भिजवणे अवघड होते. पण ते सर्वांमुळे शक्य झाले. सध्या सुरू असलेले बंदिस्त पाईपलाईनचे काम जानेवारी पर्यंत पूर्ण करू व शेतकऱ्यांच्या विहिरीत पाणी पाइपद्वारे देऊ.१ कोटी रुपयाची स्कीम वडापुरी परिसरात आदर्श असेल तसेच भाटनिमगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम १ कोटी ७३ लाखात पूर्ण झाले असून ते इंदापूर तालुक्यातील सहा- सात गावांना व सोलापूर येथील माढा तालुक्यातील आठ गावांना वरदान ठरले आहे. त्याचे उद्घाटन लवकरच केली जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या सभासद व संचालकांनी संस्थेचे विज बिल, मशनरी रिपेरिंग, तसेच पाणीपुरवठा संस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रगतीचा महत्त्वाचा घटक आहे. यावरती अनेक शेतकरी आपली शेती उत्तम रित्या पिकून एक आर्थिक सुबत्ता निर्माण करत असतो. परंतु काही कारणास्तव ज्या अडचणी निर्माण होतात त्या अडचणी सोडवण्यासाठी शासनाने अशा शेतकरी पाणीपुरवठा संस्थांना मदत करावी या मागणीवर बोलताना गारटकर म्हणाले की,
प्रत्येक परिसरातील पाणी पुरवठा संस्थेमुळे परिसराचा कायापालट होतो.अनेक उद्योग चालतात.त्यामुळे या संस्था टिकल्या पाहिजेत.
महाराष्ट्रातील सहकारी पाणीपुरवठा संस्था यांना यापुढे ज्या अडचणी निर्माण होतील. त्यासाठी शासनकडे पाठपुरावा करू असे त्यांनी आश्वासित केले.
तसेच संस्थेचे उपाध्यक्ष हरिदास माने यांनी प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, पाणी पुरवठा संस्थेला वीज बील परवडत नसल्याने यापुढे सोलार पॅनल बसवणे, पिकांना ड्रीप करणे उच्च प्रतीची बियाणे वापरणे इत्यादी प्रयोग संस्थेच्या माध्यमातून राबवले जावे असे त्यांनी आपले मत व्यक्त केले.
सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकारी व सभासद यांचे आभार शरद सावंत यांनी व्यक्त केले.

