shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुलांनी शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे - पी. एल.पाटील मुख्य न्यायाधीश, दिवाणी न्यायालय इंदापूर

 

मुलांनी शिक्षण घेत असतानाच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे - पी. एल.पाटील मुख्य न्यायाधीश,  दिवाणी न्यायालय इंदापूर 
इंदापूर प्रतिनिधी  :- मुलांनी शिक्षण घेत असतानाच आपल्याला भविष्यात काय व्हायचे आहे, याचे ध्येय निश्चित करूनच शिक्षण घेतले पाहिजे असे प्रतिपादन इंदापूर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पी. एल.पाटील  यांनी बालदिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिरात ( दि.१४) रोजी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट इंदापूर येथे तालुका विधी सेवा समिती व वकील संघ इंदापूर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रात ते बोलत होते.
श्री.पाटील पुढे म्हणाले की, शिक्षण घेत असतानाच मुलांनी बाह्य गोष्टीकडे  आकर्षित न होता, ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली पाहिजे.असे आपल्या अध्यक्षीय भाषणात नमूद केले.
श्रीमती वडगावकर (सह.दिवाणी न्यायाधीश, न्यायालय इंदापूर) म्हणाल्या की, आजही समाजाला मुलांच्या हक्काची पुरेशी माहिती नाही. कायद्यामध्ये बालकांच्या हक्क, अधिकाराची तरतूद केलेली आहे.
बालकांना जगण्याचा अधिकार, विकासाचा अधिकार, सुरक्षितेचा अधिकार, सहभागाचा अधिकार ह्या अधिकारांची तरतूद आहे, तो कायद्याने बालकांना बहाल केला आहे असे त्या म्हणाल्या. बालकांच्या अधिकाराबाबत सविस्तर माहिती आपल्या भाषणात श्रीमती वडगावकर यांनी दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमती वडगावकर  (सह. दिवाणी न्यायाधीश, दिवाणी न्यायालय इंदापूर)  यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. पी. एल. पाटील साहेब (मुख्य न्यायाधीश, दिवाणी न्यायालय, इंदापूर) हे लाभले होते.
संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. उपस्थित मुलांनाही गुलाबपुष्प देऊन त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. कार्यक्रम स्थळी मुलांना कायदेविषयक संदर्भात (नालसा) व्हिडिओ दाखवण्यात आला होता.
ॲड. ए. टी. भोसले यांनी बालकांचे हक्क व मोफत शिक्षणाचा अधिकार या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले, तर आभार ॲड. समीर टिळेकर यांनी मानले.
कार्यक्रमास ॲड. प्रमोद खरात (अध्यक्ष, वकील संघटना इंदापूर ), ॲड. एन.जी. शहा, ॲड. प्रकाश वाघमोडे, ॲड. धनंजय विंचू , ॲड. शशिकांत साबळे, ॲड. कुंडलिक मारकड, ॲड. जमीर मुलानी, ॲड. रवींद्र कोकरे, ॲड. आशुतोष भोसले, ॲड. आसिफ बागवान, ॲड.प्रिया शिंदे- मखरे,ॲड. किरण लोंढे,ॲड. सुरज मखरे व
इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेचे अध्यक्षा आयु. शकुंतला मखरे (काकी), संचालक गोरख तिकोटे, सचिव ॲड.समीर मखरे संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
close