इंदापूर तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस पाटलांचा गौरव... इंदापूर पोलिस स्टेशनचा प्रेरणादायी उपक्रमशील समारंभ संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांच्या हस्ते तालुक्यातील ज्या गावातील पोलिस पाटलांची कामगिरी उत्कृष्ट आहे अशा पोलिस पाटलांचा (दि. १२) नोव्हेंबर रोजी ५.३० वाजता सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दल यांची एकत्रित बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये ज्या गावातील पोलीस पाटलांनी आपआपल्या गावात शांतता, सुव्यवस्थाच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आशा पोलीस पाटलांना व त्यांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या पोलीस अंमलदार यांना पोलीस निरीक्षक मुजावर यांच्या हस्ते प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले. अशा या उपक्रमशील कार्यक्रमातून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना नवी ऊर्जा, नवा जोश निर्माण होऊन पुढील कार्यास प्रेरणा मिळते.
यावेळी पोलीस निरीक्षक मुजावर यांनी प्रत्येक गावातील पोलीस पाटलांना आपापल्या गावांमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी सा.पो. नि नागनाथ पाटील, पो.उपनिरीक्षक संजय धोत्रे, पो. उपनिरीक्षक दाजी देटे, पो. उपनिरीक्षक लिगाडे व इतर पोलीस कर्मचारी तसेच अनेक गावातील पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा दलातील युवक उपस्थित होते.