shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्रने बारामती येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सामील होऊन दिला पाठिंबा

तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्रने बारामती येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सामील होऊन दिला पाठिंबा . 
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्रात एसटी कर्मचारी संघटनेच्यावतीने गेली काही दिवसापासून विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला असून तेज पृथ्वी ग्रुप महाराष्ट्र च्या वतीने आज दिनांक १२ नोव्हेंबर रोजी बारामती एम .आय. डि. सी. आगार येथे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये सामील होऊन त्यांना पाठिंबा दिला. तसे पाठिंब्याचे पत्र तेज पृथ्वी ग्रुपचे इंदापूर तालुका अध्यक्ष राहुल नाकाडे यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी तेज पृथ्वी ग्रुपचे सुहास खंडागळे, गणेश खडांगळे ,सुहास खाडे,प्राध्यापक सचिन कोरडकर, तानाजी हेगडकर, सोमनाथ वाघमोडे कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.
close