अचानक लागलेल्या आगीने पस्तीस एकरांतील ऊस जळून खाक..अचानक लागलेल्या आगीने पस्तीस एकरांतील ऊस जळून खाक..
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील अवसरी येथे आज दिनांक १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजे च्या सुमारास अचानक लागलेल्या आगीमुळे ३० ते ३५ एकरातील ऊस जळून गेला आहे.
गोरख तावरे,प्रकाश गायकवाड, कल्याण शिंदे, हरिदास शिंदे, संभाजी बोंगाणे ही ऊस जळालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
आग लागल्याची वार्ता समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.या वेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक शांतीलाल शिंदे यांनी घटनास्थळी येऊन घटनेची पाहणी केली.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक दल तसेच इंदापूर नगरपालिका अग्निशामक दल, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक दल त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध झाल्याने पुढील हानी मोठी हानी टळली आहे.
आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.
यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.

