shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गरिबांच्या जीवाशी खेळायचे कधी थांबणार ? असा सवाल मुख्यमंत्री यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने..!

अहमदनगर । प्रतिनिधी (राधेश्याम कुसमुडे):
अहमदनगर जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील घडलेल्या मृत्यूतांडवाच्या तसेच रूग्णालय प्रशासनाच्या निषेधार्थ नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांच्या मार्फत मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांना रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार निवेदन देण्यात आले आणि त्यांना सवाल करण्यात आला की ठाकरे साहेब गरिबांच्या जीवाशी खेळायचे कधी थांबणार? गरिबांचे मरण इतके स्वस्त झाले, त्याची पैशाने भरपाई होइल का ? असा सवाल रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या वतीने करण्यात आला. 

पुढे निवेदनात असे म्हटले आहे की यंदाच्या वर्षी जानेवारी मध्ये भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा आगीने होरपळून मृत्यू झाला. एप्रिल मध्ये नाशिक रुग्णालयात २५ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आणि अहमदनगर जिल्हा रुग्णालयातर ११ पेक्षा अधिक रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला असून २० रूग्ण चिंताजनक अवस्थेत आहेत. इतक्या गंभीर घटना घडल्यानंतरही राज्याच्या आरोग्य यंत्रणेला जाग येणार का नाही ? अशा दुर्दैवी घटनांमुळे सरकारी रूग्णालयांवरचा विश्वास उडाला असल्याची लोकांची भावना निर्माण झाली आहे. मोलमजुरी करणार्‍या सामान्य गरीब मध्यम वर्गीय नागरिकांना खाजगी हॉस्पिटलमध्ये ईलाज करणे परवडणारे नाही म्हणून त्यांनी सरकारी हॉस्पिटल मध्ये दरवेळी मृत्यूची परिक्षा द्यायची का ? रुग्णालयाची तपासणी आणि फायर ऑडिट आणि मेंटेनन्सच्या नावाखाली दरवर्षी बोकाळणारा लाखो करोडोंचा भ्रष्टाचार यामुळेच आज सरकारी यंत्रणेच्या हलगर्जी कारभारामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. 

पुढे निवेदनात असेही म्हटले आहे की मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांना दोन पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करून त्याची चेष्टा केली जाते त्यामुळे गरीब मजबूर लोकांचे प्राण परत येणार आहे का ?इत्यादी सवाल करून मागणी केली आहे की, नमुद भंडारा, नाशिक, अहमदनगर येथील सर्व घटनांची नैतिक जबाबदारी म्हणून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन मंत्री पदावरून तात्काळ मुक्तता करण्यात यावी ग्रामीण रुग्णालयातील घडलेल्या मृत्यूतांडवास जबाबदार असणाऱ्या रूग्णालय प्रशासनाचे प्रमुख डाॅ. सुनिल पोखरणा व इतर प्रशासकीय अधिकारी यांच्यावर भारतीय दंड संहिता  मनुष्यवधाचा कलम ३०४ अ निष्काळजी पणाने हयगयीने बेदकारपणे कृत्य केले म्हणून कलम ३३६, ३३७, ३३८, व जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कलम १६६ प्रमाणे गुन्हे दाखल करून यांच्या मालमत्तेची चौकशी करून जप्त करण्यात यावी. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रूपयांची मदत करावी निवेदनाद्वारे केली आहे. 

यावेळी रिपब्लिकन सेना अहमदनगर जिल्हाप्रमुख राजू आढाव, जिल्हाउपप्रमुख भरत भांबळ, समीर गायकवाड, जिल्हा संघटक अमजदभाई पठाण, शेवगाव तालुकाप्रमुख वसंत साबळे, राहुरी तालुका युवकप्रमुख विनोद पवार, अंजुमभाई पटेल बारागाव नांदूर विनोद घाडगे उपप्रमुख शेवगाव अमोल मकासरे, वांबोरी शहर प्रमुख राजूभाऊ पाटोळे, नगर तालुका प्रमुख भाऊसाहेब तूजारे, शाखाप्रमुख आंत्रे पवार, तुळशीराम पवार, संदीप भांबळ, साळवे मामा इ. रिपब्लिकन सेना पदाधिकारी ऊपस्थित होते.
close