shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एरंडोल ता. ग्रामसेवक संघटनेतर्फेआ.संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करा असे निवेदन देण्यात आले..!

प्रतिनिधी । एरंडोल
एरंडोल :- आमदार  संजय शिरसाठ यांनी ग्रामसेवक संवगांविषयी केलेल्या आक्षेपार्य विषयानुसार सरपंच व ग्रामसेवक यांच्यात तेढ निर्माण होणेसाठी केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना एरंडोल तालुक्याच्या वतीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
ग्रामसेवक संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कीआमदार  संजय शिरसाठ विधानसभाक्षेत्र औरंगाबाद पश्चिम यांनी दिनांक - ०८/११/२०२१ रोजी औरंगाबाद येथे सरपंचांचे प्रशिक्षण कार्यशाळेत भाषण करतांना शासकीय व्यासपीठावरून ग्रामसेवक संवर्गाबद्दल “भामटा, हरामखोर" इत्यादी अपशब्द वापरून संवर्गाची बदनामी केली तसेच ग्रामविकासात सरपंच व ग्रामसेवक यांची सयुक्तिक जबाबदारीचे भान न ठेवता दोघामध्ये तेढ निर्माण कशी होईल अशा दृष्टीने ग्रामसेवक तुमचा नोकर आहे. तो तुमच्या हाताखाली काम करतो, त्याचे ऐकू नका, असे बेजबाबदार विधान करून दोन ग्रुपमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले व चिथावणी खोरभाषण करून संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश देवून ग्रामसेवक संवर्गाविषयी अविश्वासाचे वातावरण तयार केले, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामसेवक संवर्ग प्रचंड तणावात येवून संवर्गात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तरी, आमदार संजय शिरसाठ यांचेवर भारतीय दंड सहिंता १८६० चे कलम १०७.२८८.२९४.४९९.५०४.५०६. नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आज नोंदवत असलेला निषेध व एक दिवस कामबंद आंदोलनाचे रुपांतर मोठ्या आंदोलनात होईल असे म्हटले आले या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष आर के पटाईत, उपाध्यक्ष एम एस देवरे, सचिव आर एम पवार, यांच्या स्वाक्षर्‍या आहेत तर निवेदन देतेवेळी जिल्हा प्रतिनिधी आर बी पाटील, पी एस अहिरे,ए एन पाटील,ए एम बाविस्कर, आर एस पाटील, व्ही टी पाटील, एम बी महाजन, पि के खोब्रागडे यावेळी उपस्थित होते.

close