अशोक सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन कै. गुलाबराव अण्णा पा.पवार यांना भावपूर्ण आदरांजली..!
अतिशय करारी स्पष्टोक्त व स्वाभीमानी तसेच दिलेल्या शब्दाशी ठाम राहून दिला शब्द पाळणारा 'नेता' असा लौकीक असणारे अशोक सहकारी साखर कारखान्याचे मा.चेअरमन कै. गुलाबराव अण्णा पा.पवार हे आपल्यातून १० दिवसापूर्वी निघून गेले खरं तर त्यांना श्रद्धांजली वाहताना अतिशय दुःख होत आहे.
अण्णांचे त्यांच्या सर्व बंधुंचे व माझ्या वडिलांचे अंत्यत कौटुंबीक व सलोख्याचे संबंध होते. नंतरच्या काही काळात राजकारणातील सहभागामुळे दोन्ही कुटुंबात अबोला झाला, पण ते त्यांच्या नेत्या सोबत तर आम्ही आमच्या नेत्या सोबत प्रामाणीक राहीलो. त्याकाळात आम्ही मत- मतांतरात एकमेकांवर भरपूर टिका टिपण्णी केली, पण वैयक्तीक व कुटुंबावर नाही. नंतरच्या काळात काही चांगल्या घटना घडल्यामुळे व सर्वांना न्याय देण्याच्या विचाराने आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली,आणि 'अण्णा' काय होते ते आणखी समजले, अण्णा होते म्हणूनच मागील 5 वर्षात गाव कारभारात पहिल्यांदाच सर्व सामान्यांना अगदी माझ्या सहित सरपंच व उपसरपंच तसेच चेअरमन व्हा. चेअरमन अशी मानाची पदे मिळाली.
सर्वांना बरोबर घेऊन चालणारा व 'जो नेता सत्तेत तोच फक्त आपला नेता अशी भुमिका कधीही न घेता, चांगल्या वाईट काळात आपल्या नेत्याबरोबर प्रामाणिक निष्ठावंत राहणारा असा नेता तथा अण्णा पुन्हा होणे नाही.
श्री.सुनिल कुदळे (उपसरपंच- ग्रामपंचायत, वडाळा महादेव,ता. श्रीरामपूर)
अण्णांना मी माझ्या कुदळे कुटुंबीय व स्व ससाणे साहेब मित्रमंडळाच्या आमदार कानडे साहेबांच्यावतीने तसेच मित्र परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो..!

