shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यात विवाह सोहळा, समारंभ ,संमेलनासाठी आता असतील ‘हे’ नियम; उल्लंघन झाल्यास..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
शनिवार दिनांक २७ नोव्हेंबर २०२१

मुंबई : कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. दुसऱ्या लाटेने जास्त कहर केला. याची तीव्रता महाराष्ट्रामध्ये जास्त होती. परंतु अलीकडील काळात कोरोनाची प्रकरणे कमी झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात निर्बंध कमी करण्यात आले होते. परंतु अलीकडील काही दिवसांचा विचार करता कोविड रुग्णसंख्या पुन्हा वाढली आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा अलर्ट झालेलं आहे. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेत  कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे.
     हा नवा ओमिक्रॉन स्ट्रेन अत्यंत धोकादायकरित्या पसरत चालला असून महाराष्ट्र सरकार आतापासूनच सतर्क झालं आहे. राज्यात  अनेकप्रकारचे निर्बंध नव्याने लागू करण्यात आले आहेत.
 
        राज्य सरकारने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या. कोणताही कार्यक्रम, समारंभ इत्यादींमधील उपस्थितीवरील निर्बंधामध्ये चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाच्या अथवा समारंभाच्या उपक्रमाच्या बाबतीत,

जागेच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. संपूर्ण संमेलनांसाठी तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना परवानगी दिली जाईल. कोणत्याही संमेलनासाठी  उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या १ हजारांपेक्षा अधिक असेल तर अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला त्याची माहिती द्यावी लागेल आणि स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अशा कोणत्याही संमेलनाचे (मेळाव्याचे निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांचे प्रतिनिधी पाठवील आणि तेथे स्थानिक प्रशासन काटेकोरपणे अनुपालन केले जात असल्याची खात्री करतील.

         कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले तर स्थानिक प्रशासनाला सदर कार्यक्रम पूर्णतः किंवा अंशत: बंद करण्याचे अधिकार आहेत.


 
 काय आहे नियमावली?
-रिक्षा, टॅक्सी, बस, कॅबमध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवास करता येईल. म्हणजे यापुढे सार्वजनिक अथवा खासगी वाहनात केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. लस घेतली नसेल तर प्रवास करता येणार नाही.
-महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किंवा प्रवासाच्या ७२ तास आधीचा आरटी पीसीआर चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
 
-सिनेमा हॉल, लग्नाचे हॉल, सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के लोकांनाच उपस्थित राहता येईल.
-मास्क घातलेला नसेल तर ५०० रुपये दंड
 
-दुकानात ग्राहकाकडे मास्क न घातल्यास दुकानदाराला १० हजार दंड, तर मॉलमध्ये कुणी मास्क न घातल्यास मालकाला ५० हजार दंड
-राजकीय सभा, कार्यक्रमात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास ५० हजार दंड
 
-भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी केवळ २५ टक्के लोकांनाच उपस्थिती
-टॅक्सी किंवा खासगी वाहनात मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड तसेच वाहन मालकासही ५०० रुपये दंड ठोठावण्यात येईल.

-किमान ६ फूट अंतर राहील असं सोशल डिस्टेंसिंगचं पालन करावं.
-सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास सक्त मनाई
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close