एरंडोल :- कोविंड साथरोगाच्या तिसऱ्या लाटेच्या वर्तविलेल्या शक्यतेच्या अनुषंघाने कोविड लसीकरणाचे प्रमाण मोठया संख्येने तात्काळ वाढविणे आवश्यक असल्यामुळे नागरी क्षेत्रात हर घर दस्तक मोहिमेचे प्रभावी अंमलबजावणी करणे व त्या अंतर्गत लसीकरणाचे प्रमाण मोठया संख्येने वाढविणेच्या दृष्टीने नियोजन करण्यात यावे म्हणून एरंडोल शहरातील दररोज सकाळी तीन ठिकाणी व सायंकाळी तीन ठिकाणी असे सहा ठिकाणी लसीकरनाच्या शुभारंभ समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार सुचिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नाना भाऊ महाजन, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कैलास पाटील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी रवींद्र महाजन बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा मनोज पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, निराधार समितीचे सदस्य आनंदा चौधरी डॉ. मुकेश चौधरी या मान्यवरांच्या हस्ते हर घर दस्तक अभियानांतर्गत लसीकरणाची सुरुवात या वेळी करण्यात आली.
नगरपालिका प्रशासनातर्फे टेबल-खुर्च्या मंडप व डाटा ऑपरेटर, सहाय्यक याची व्यवस्था करण्यात आली व ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख परिश्रम घेत आहेत.
हर घर दस्तक या अभियाना अंतर्गत होणाऱ्या लसीकरणासाठी नागरिकांकडून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. रविवारी सकाळी देशमुख मढी, श्रीराम चौक व जोहरी गल्ली येथे व सायंकाळी पांडव वाडा, लक्ष्मी नगर, गुरुकुल कॉलनी महात्मा फुले पुतळ्याजवळ लसीकरण घेण्यात आले या परिसरातील नगरसेविका आरती महाजन, वर्षा शिंदे नगरसेवक अभिजीत पाटील, योगेश देवरे, अतुल महाजन,आनंद दाभाडे, आनंदा चौधरी, कुणाल पाटील, नितीन पाटील, सागर महाजन, तसेच पंचशील मित्र मंडळाचे कार्यकर्तेही नागरिकांना घरोघरी जाऊन लसीकरणासाठी आग्रह करीत होते.
शहरातील बहुतांश भागात शेतकरीवर्ग असल्यामुळे उशिरा रात्री नऊ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज शेख यांचे मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे योगेश सुकटे, विकास पंचबुद्धे आरोग्य विभागाचे अतुल सोनवणे, केशव ठाकूर, व आरोग्य सेविका हे लसीकरणासाठी परिश्रम घेत आहेत.

