shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा.मोतीलाल सोनवणे समाजरत्न पुरस्काराने सन्मानित..!


  न्याहाळोद : ता.जि.धुळे येथील आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल वीरांगना झलकारी बाई कोळी श्री शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विरांगणा झलकारीबाई यांच्या जयंतीनिमित्त धुळे येथील राजश्री शाहू नाट्यमंदिरात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

    यापूर्वी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार, साहित्यिक पुरस्कार, शेतकरी मित्र पुरस्कार,आदर्श समाजसेवक पुरस्कार,राष्ट्रीय सेव्हनस्टार पुरस्कार,आदिवासी कोळी भूषण पुरस्कार, राज्यस्तरीय महाराष्ट्र कला गौरव पुरस्कार,राज्यस्तरीय वाल्मीकी समाजसेवा पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न पुरस्कार,ठाणे काँग्रेस सन्मान पुरस्कार,माता मनुदेवी संस्था जळगाव व महर्षी वाल्मिकी बहुउद्देशीय संस्था अकोला, भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे ८४ वे अधिवेशन दिनांक १८ व १९ जानेवारी २०१३ आदिवासी लोक संस्कृति, लोकसाहित्य, लोककला आणि बोली विषयक भाषिक संशोधन यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले आहे...!
       त्यावेळी संस्थेच्या अध्यक्षा गितांजलीताई कोळी, तहसीलदार सुदाम महाजन, अध्यक्ष संजय दावळे, अध्यक्ष संदीप तवर,उमेश शिंदे, साहेबराव वाकडे, रवींद्र मंडाळे, अशोक काकुळदे, सुभाष अहिरे, आशा रंधे, सौ सीमाताई रंधे, विजय मानमोडे, आप्पा बिरारी, जितेंद्र देसले, प्रवीण माळी, सारिकाताई रंधे, पत्रकार विजय माळी, अमोल नवसारे, विजय चित्ते यांच्यासह वाल्या सेना खानदेशचे व आदिवासी विकास संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
close