shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर विधानपरिषदेची १००% मतदार यादी तयार झाल्या नंतरच निवडणूक घ्यावी ही विनंती मान्य केल्याने निवडणूक आयोगाचे हार्दिक आभार - आप्पासाहेब ढुस..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरूवार दिनांक १० नोव्हेंबर २०२१
देवळाली प्रवरा : अहमदनगर विधानपरिषदेची १००% मतदार यादी तयार झाल्या नंतरच निवडणूक घ्यावी तोपर्यंत ही निवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती मान्य करून निवडणूक आयोगाने अहमदनगर विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली त्याबद्दल आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त केले.
           आप्पासाहेब ढुस यांनी ईमेल द्वारे निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात म्हंटले होते की, अहमदनगर जिल्ह्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा कार्यकाळ संपत आला आहे, तसेच नेवासा, कर्जत, जामखेड, अकोला नगरपंचायत सदस्यांचा कार्यकाळ संपून एक वर्षं झाले आहे. कोरोनामुळे येथील निवडणूक झालेली नाही, त्यामुळे येथील सदस्यांचा या विधानपरिषद मतदार यादीत समावेश झालेला नाही. अपवादात्मक परिस्थिती मुळे हे सदस्य मतदार यादीत सामील होऊ शकले नसले तरी या सदस्यांना त्यांच्या मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. 
      देवळाली प्रवरा नगरपालिकेची मागील निवडणूक २६ नोव्हेंबर २०१६ झाली आहे. त्यामुळे कोरोना काळ नसता तर येथील सदस्यांचा कार्यकाळ संपला असता व निवडणुक झाली असती. आणि नवीन सदस्यांनी कार्यभार सांभाळणेस सुरुवात केली असती. त्यामुळे यांना व अश्या कार्यकाळ संपलेल्या सदस्यांना मतदार सूचित सामील करून मत देणेचा अधिकार देणे बेकायदेशीर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील बऱ्याच नगरपालिका आणि त्यांच्या सदस्यांचा कार्यकाळ थोड्याच दिवसात संपणार आहे. विधानपरिषदेच्या निवडणूकी पूर्वी कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांना मतदारयादीत सामील करून मत देणेचा अधिकार देने कायद्याला धरून नाही. 
      वरील मुद्यांचा विचार करता जिल्ह्यातील बऱ्याच नगरपरिषद सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने व काही नगरपालिकेचा संपल्याने मतदारांची टक्केवारी घटली आहे. व घटणार आहे, त्यामुळे ही मतदार यादी नियमबाह्य झाली असल्याने अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेची निवडणूक झाले नंतर विधानपरिषद निवडणूकीसाठी जी १००% मतदारांची मतदातयादी तयार होईल त्यानंतरच उपरोक्त विधानपरिषद निवडणूक घेणेत यावी अशी विनंती ढुस यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, दिल्ली. राज्य निवडणूक आयोग मुंबई, तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांना ईमेल द्वारे पाठविलेल्या निवेदनात म्हंटले होते.
            या विनंतीवरून निवडणूक आयोगाने तात्काळ निर्णय घेतला व अहमदनगर जिल्ह्यातील विधानपरिषद निवडणूक पुढे ढकलली त्या बद्दल आप्पासाहेब ढुस यांनी आज निवडणूक आयोगाचे ईमेल द्वारे आभार व्यक्त केले आहेत.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close