shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंकज कुमावत यांची गोदा पात्रातील अवैद्य वाळू विरुद्ध धाडसी कार्यवाही..!



अवैद्य वाळू तस्करी आणि वाहतुकीवर कार्यवाही : वाळूचे हायवा टिप्पर व गोदा पात्रातील वाळू घेतली ताब्यात..!! 
-------------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-
गेवराई तालुक्यातून केजच्या दिशेने अवैद्यरित्या वाळू घेऊन निघालेल्या टिप्परची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळताच त्यांनी सापळा लावून धाडसी कार्यवाही केली. तसेच रात्री ३०० वाजता गेवराई तालुक्यातील पिंपळगाव माळ स आणि राक्षभुवन येथे छापा घालून मशीन व वाळूसाठ्यावर कार्यवाही केली.

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना दि. १ नोव्हेंबर रोजी एका गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक हायवा टिप्पर क्र. (एमएच-२४/एयु-१५५०) हे गेवराई तालुक्यातील पिंपळगाव येथून गोदावरी नदी पात्रातून अवैद्यरित्या वाळू घेऊन केजकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्या माहिती वरून सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह केज-बीड महामार्गावरील मस्साजोग येथे सापळा लावला. त्यांच्या सोबत सपोनि संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक माने पोलीस अंमलदार बालाजी दराडे, बांगर, स्वप्नील सातपुते, भंडाने, सचिन अहंकारे, धनपाल लोखंडे, महादेव बहिरवाल, यादव, भुंबे हे होते. पंकज कुमावत यांच्या पथकाने सदर टिप्पर हे मस्साजोग येथे येताच; झडप घालून ताब्यात घेतले. 

सदर वाळूने भरलेले टिप्पर केज पोलीस ठाण्यात आणले. नंतर  टिप्परच्या ड्रायव्हरकडे अधिक चौकशी केली असता ही वाळू गेवराई तालुक्यातील पिंपळगाव माळस येथील गोदावरी नदीपात्रातून आल्याचे निष्पन्न होताच सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी आपला मोर्चा गेवराई तालुक्यातील पिंपळगाव माळसकडे वळविला. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आर. राजास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक माने, पोलीस अंमलदार बालाजी दराडे, बांगर, स्वप्नील सातपुते, भंडाने, सचिन अहंकारे, धनपाल लोखंडे, महादेव बहिरवाल, यादव, भुंबे यांना सोबत घेऊन रात्री ३:०० वा. राक्षभुवन आणि पिंपळगाव माळस येथे गोदावरी पात्रात चालणाऱ्या अवैद्य वाळू तस्करीवर छापा मारला. यात त्यांना मिळून आलेले वाळूसाठ्याचे ढिगारे आणि वाळू उपसा करणारे मशीन हे जप्त करून जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना कळविले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराईचे तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना कळवून कार्यवाही केली. 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत त्यांच्या धाडसी कार्यवाहिमुळे अवैद्य वाळू वाहतूक आणि वाळू उपसा करणारे यांच्या दहशत पसरली आहे.
close