shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सिंघम आयपीएस पंकज कुमावत यांची आणखी एक धडाकेबाज कार्यवाही..!!

राधा-कृष्णाच्या नावाच्या कंपनीत तेल आणि दुधा पासून बनविला जात होता बनावट खवा...

बनावट खवा तयार करून लोकांच्या जिविताशी खेळणाऱ्या कंपनीवर कार्यवाही : सव्वा पाच लाखाचा बनावट खवा ताब्यात...

___________________________________
प्रकाश मुंडे| बीड जिल्हा प्रतिनिधि :-

बीड जिल्ह्यातील सिंघम आयपीएस पंकज कुमावत यांनी अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याचा सपाटा लावला असून त्यांनी केज-बीड रोडवर खुलेआम सुरू असलेल्या बनावट खवा बनविणाऱ्या कंपनीवर धाड टाकून सुमारे सव्वा पाच लाख रु. चा मुद्देमाल ताब्यात घेतला.

या बाबतची माहिती अशी की, केज येथे केज-बीड रोड वरील डॉ पद्मसिंह विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या समोर धनंजय महादेव चौरे (रा. जिवाचीवाडी ता. केज जि. बीड) यांच्या मालकीची व्हर्टिकली फूड्स राधा-कृष्ण कंपनी येथे वनस्पती तेल व दुधाच्या पावडर पासून लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण करणारा बनावट खवा तयार करीत असल्याची माहिती एका गुप्त खबऱ्या मार्फत सिंघम आयपीएस केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना मिळाली.

माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी, अन्न सुरक्षा अधिकारी तम्नवार व मुक्तार यांना माहिती दिली. पंकज कुमावत यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पंच सोबत घेऊन दि. २४ नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री ९:०० वा छापा मारला. त्यात त्यांना व्हर्टिकल फूड्स राधा-कृष्ण कंपनीत दुधाच्या पावडर मध्ये रुची तेल टाकून त्या पासून बनावट खवा तयार करून त्याची विक्री होत असताना पंकज कुमावत यांच्या पथकाने तेथे २ हजार ९५८ किलो ग्रॅम बनावट खवा ताब्यात घेतला. हा बनावट माल ५ लाख ३७ हजार ४८० रु. किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. कार्यवाहीत जप्त केलेला बनावट खव्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून पुढील आदेश येईपर्यंत कंपनीला सील ठोकले आहे. 

या कार्यवाहीत सिंघम आयपीएस सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या सोबत अन्न सुरक्षा पथकाचे सय्यद इम्रान हाश्मी, तम्नवार, मुकतार व पोलीस उपनिरीक्षक मारुती माने, पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोलीस नाईक रामहरी भंडाने, राजू वंजारे, सचिन अहंकारे, संतोष राठोड, शेंडगे, महिला पोलीस जमादार पाचपिंडे हे सहभागी झाले होते.
close