shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एक वर्षाचा विघ्नेश झालाय वृक्षमित्र ;वाढदिवसानिमित्त केले वृक्षरोपांचे वाटप


प्रतिनिधी : आसावरी वायकर

भेंडा : दि . २५ /  नेवासा तालुक्यातील भेंडा येथील प्रविण देशमुख आणि परिवार यांनी त्यांचा मुलगा विघ्नेश याच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चांना टाळून विविध वृक्षांच्या रोपाचे वाटप केले .प्रविण देशमुख यांचा मूलगा विघ्नेश .या मूलाचा २५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहिलाच वाढदिवस असल्याने त्यांनी या दिवशी विविध वृक्षरोपांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले 

आंबा , चिंच, वड ,पिंपळ अशा विविध वृक्षांची रोपे त्यांनी या दिवशी सर्वांना वाटून विघ्नेश चा वाढदिवस साजरा केला आणि समाजापुढे एक अनोखा आदर्श घालून दिला . वृक्षसंवर्धन काळाची गरज असल्याचे त्यांनी या निमित्ताने समाजाला दाखवून दिले .

त्यामुळे विघ्नेश याला  'वृक्षमित्र ' संबोधून सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत विघ्नेश याला भरभरून आशिर्वाद दिले .

यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने किरण मनवेलीकर, अनिल देशमुख, गणेश घुले, राजेंद्र मनवेलीकर, युवराज देशमुख, अभिजित देशमुख, अशोक पांगरे, सचिन बडधे, नंदकिशोर दहातोंडे, राहुल पाटील, नारायण निबे आदी मान्यवर उपस्थित होते.
close