शेतीसाठी वीज पुरवठा सुरु व्हावा यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट.
इंदापूर प्रतिनिधी:शेतकरी वर्ग अनेक अडचणींना सामोरे जात असताना राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतीसाठीचा वीज पुरवठा खंडित केला जातोय तो पूर्ववत व्हावा यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मुंबई येथे राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भेट घेऊन शेतीसाठी वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी त्यांना विनंती केली.
शेतकरी वर्ग अद्यापी कोरोना तसेच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे.महावितरणने सध्या शेतीपंपांचा वीज पुरवठा वीज थकबाकी वसुलीसाठी खंडित केला आहे. शासनाने शेतकऱ्यांना वेठीस धरणे बंद करून तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववतपणे चालु करावा यासाठी राजभवन येथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन शेती वीज पुरवठा सुरू व्हावा यासाठी प्रयत्न केला आहे.
राज्य सरकार वारंवार शेतकऱ्यांना शेती वीज पंपासाठी वेटीस धरत आहे त्यांची या अडचणीतून सुटका व्हावी यासाठी सरकारी दरबारी राज्यपालांनी लक्ष घालून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला संजीवनी मिळावी यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी राज्यपालांना विनंती केली आहे.

