shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरे हिला ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने देण्यात आले हक्काच घर...!

घराची चावी केली सुपुर्द...!

शिवसेनेने पुन्हा एकदा दिलेला शब्द पूर्ण केला...!!

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / गुंतवणुक (ईन्वेस्टमेंन्ट) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप - ९७६८४२५७५७.

ठाणे : स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेन मध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलमधून खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते श्री एकनाथ शिंदे तात्काळ रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी तिच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शिवसेनेच्या वतीने उचलण्यात आला तसेच तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करित शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. 

मूळच्या ठाण्यातील मानपाडा येथे राहणाऱ्या रुणालीकडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली. 

याप्रसंगी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.
close