shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खुळे चौक येथे डिव्हायडर मध्ये मोकळी जागा सोडून स्पीड ब्रेकर टाकण्या संदर्भात बांधकाम अभियंता इंदापूर यांना तेजपृथ्वी ग्रुपने दिले निवेदन.

खुळे चौक येथे डिव्हायडर मध्ये मोकळी जागा सोडून स्पीड ब्रेकर टाकण्या संदर्भात बांधकाम अभियंता इंदापूर यांना तेजपृथ्वी ग्रुपने दिले निवेदन.

इंदापूर प्रतिनिधी: पुणे- सोलापूर जुना हायवे खुळे चौक येथे अष्टविनायक  व्हिल अलाईमेंट  व पांडुरंग कृषी सेवा केंद्रा समोर जुना डिव्हायडर असून आता तिथे नवीन डिव्हायडरचे काम चालू केले आहे. त्या पासून पुढे अजून शंभर ते दीडशे फूट वाढवत आहेत. तरी नवीन डिव्हायडर मुळे दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. याचा बांधकाम खात्याने विचार करून नवीन डिव्हायडर व जुना डिव्हायडर दोन्हीच्या मध्ये १० ते १२ फूट अंतर सोडावे व अपघात होऊ नयेत म्हणून स्पीड ब्रेकर चे नियोजन करावे. दोन्ही बाजूला व्यापारी असून   कोरोनो महामारी मुळे  एक तर धंदा कमी आहे .आणि जर हे काम पूर्ण झाले  तर कस्टमर कमी होण्याची भीती व्यापाऱ्यांना असून बांधकाम खात्याने डिव्हायडरच्या मधे जागा सोडून व स्पीड ब्रेकर करूंन बाकी काम करावे असे  निवेदन बांधकाम अभियंता इंदापूर यांच्याकडे देण्यात आले. 
यावेळी कृषी सेवा केंद्राचे व्यवहारे , हेल्थकेअर मेडिकलचे दीलीप कुभांर ,अष्टविनायक व्हील अलाईमेंट अजित देवकर, कल्याणी प्लंबिंगचे जाधव,   गितांजली कलेक्शनचे नानासाहेब खरात उपस्थित असून तेजप्रुथ्वी ग्रुपच्या  संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात, उपाध्यक्ष गणेशभाऊ शिंगाडे ,संतोष कुंभार ,प्रतीक व्यवहारे  ,प्रकाश खिलारी याच्यां सह्या आहेत.
close