shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महादेव (बंडू) गायकवाड यांचे हृदयविकाराने निधन.

महादेव (बंडू) गायकवाड यांचे हृदयविकाराने निधन.
इंदापूर प्रतिनिधी: सुरवड पाणी पुरवठा संस्थेचे संचालक महादेव (बंडू )गायकवाड (वय ४५)यांचे हृदयविकाराने (दि.२४) रोजी निधन झाले.
सुरवड व पंचक्रोशी मध्ये गायकवाड हे समाज कार्यामध्ये अग्रेसर  असणारे छोट्या कार्यकर्त्यांपासून तालुक्यातील सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते .शांत संयमी व विविध क्षेत्राचा अभ्यास असणारे हे व्यक्तिमत्व अगदी तरुण वयात काल हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सुरवड पाणीपुरवठा संस्था,अवसरी पाणीपुरवठा संस्था, वडापुरी पाणीपुरवठा संस्था यांचा एक मार्गदर्शक हरपल्याची तीव्र दुःख आज होत आहे.
त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुले आहेत. सुरवड पंचक्रोशी मध्ये यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
close