shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शासकीय आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा- महेंद्र रेडके.

शासकीय आरोग्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा- महेंद्र रेडके.
इंदापूर प्रतिनिधी: दि.२५ नोव्हेंबर २०२१ रोजी मौजे पडस्थळ येथे आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन इंदापूर तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य महेंद्र रेडके यांच्या हस्ते झाले. सदर शिबिरामध्ये मधुमेह, रक्तदाब, तोंडाचा कर्करोग, टीबी तपासणी, छातीचा कर्करोग, असंसर्गजन्य आजार, वजन-उंची तपासणी, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या इत्यादी गोष्टींचा लाभ नागरिकांना होणार आहे. या सर्व तपासण्या मोफत आहेत तरी या शासकीय आरोग्य शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा व आपले आरोग्य सुदृढ ठेवावे असे मत महेंद्र रेडके यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ईशा बंगेरा यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
उपकेंद्र पिंपरी खुर्द येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, आरोग्य सेवक श्री.एस कांबळे, आरोग्य सेविका रोहिणी म्हेत्रे, आशा स्वयंसेविका वर्षाताई मुसळे,अश्विनी खरात, जयश्री नगरे, प्रभावती कडाळे, साधना कांबळे,स्नेहल ढावरे, लतिका व्यवहारे, संगीता गोरे यांनी वैद्यकीय सेवा उत्तम प्रकारे पार पाडली.

यावेळी लक्ष्मण बोंगाणे, परमेश्वर कोळेकर, प्रभाकर राऊत, बाबुराव माने, शंकर ढिरे, ग्रामसेवक मोहन यादव ,सोनबा नरूटे, महिला, रुग्ण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close