विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
इंदापूर प्रतिनिधी:जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मधील इयत्ता ५वी व ८वीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परिषद अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या २४ विद्यार्थ्यांचा १००% निकाल लागून ११ विद्यार्थी पात्र ठरले. यामध्ये विद्या निकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे इयत्ता ५वीचे युगंधर नलवडे, वैष्णवी कारंडे, पायल सानप, सृष्टी जाधव, श्रावणी साळुंके, इयत्ता 8वीचा श्रीनिवास जाधव तसेच प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल चे इयत्ता ५वीचे श्रेयस लाळगे, सृष्टी डोंगरे, ओंकार वाघमोडे, प्रथमेश हांगे, रणवीर मोहिते हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले.
या सर्व विद्यार्थ्यांचा, पालकांचा व शिष्यवृत्ती शिकविणाऱ्या निखिल मुळे, सौ.रेखा सुरवसे, सौ. प्रियंका खाडे, प्रविण शिंदे, अविनाश इनामे, सौ.लता कचरे, सागर डोईफोडे यांचा संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले यांनी सत्कार केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर , सचिव हर्षवर्धन खाडे , मुख्य सल्लगार प्रदीप गुरव , फार्मसी चे प्राचार्य सम्राट खेडकर, प्रशासक गणेश पवार हे उपस्थित होते.

