इंदापूर येथे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी श्रावणबाळ आश्रम शाळेतील मुलांबरोबर लुटला दीपावलीचा आनंद.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरातील श्रावणबाळ आश्रमशाळेतील मुलांना दीपावलीच्या शुभेच्छा देत त्यांच्याबरोबर हसत सुसंवाद करीत दीपावली निमित्त सर्व मुलांना दीपावलीचा फराळ देऊन आनंद उत्सव साजरा दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी केला.
यावेळी इंदापूर शिवसेना तालुका प्रमुख नितिन शिंदे, शहर प्रमुख मेजर महादेव सोमवशी, राज नागरी पतसंस्थाचे चेअरमन सतिश बाबर सर ,तालुका समनव्यक अरुण पवार, उपतालुका प्रमुख सुदर्शन साखरे, विभाग प्रमुख अंकुश गलांडे, माथाडी कामगारचे सरचिटणीस राजू शेवाळे, उपविभाग प्रमुख हेमंत भोसले उप शहर प्रमुख संजय खंडागळे, उप शहर प्रमुख बालाजी पाटील, गोरख कदम, महिला आघाडीच्या पुष्पा घोरपडे, शेटफळ हवेली शाखा प्रमुख अमोल शिंदे ,दिपक शिंदे, सचिन पुंडे, कालठण शाखाप्रमुख शामराव लांवड,, गोविंद पाडुळे,रवि पाडुळे, दादा मुलाणी इत्यादी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे श्रावणबाळ आश्रम शाळेतील शिक्षक विशाल करडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

