shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देहरे गावामध्ये गावाचे ग्रामदैवत श्री मांगिर बाबा मंदिराचा कळस बसविण्याचा कार्यक्रम दीपावली-पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न..!

देहरे । प्रतिनिधी:
नगर-शिर्डी-मनमाड राज्य महामार्ग क्रमांक-१० या रस्त्यावर नगरपासून २० किमी व राहुरी पासून २० किमीवर असलेल्या प्रसिद्ध देहरे गावामध्ये गावाचे ग्रामदैवत श्री मांगिर बाबा मंदिराचा कळस बसविण्याचा कार्यक्रम शुक्रवार दि .५/११/२०२१ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी गावातून कळसाची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.दिपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सदर कळस स्थापना करण्यात आले.

यावेळी घरोघरी फुले आणि रांगोळीचे विलोभनीय दृश्य दिसत होते. अशा मनोहारी दृश्यात कळसाची गावातून मिरवणूक काढण्यात आली होती. 


यावेळी बँड, टाळ मृदुंग, देवाचे पारंपारीक वादय, डफ अशी पथके मोठ्या आनंदाने सहभागी झाली होती. कळसपूजन देवस्थानचे भगत श्री नवनाथ जाधव, सुरेश काळे , ज्ञानदेव पिंपळे व इतर मानकरी यांच्या हस्ते झाल्यानंतर बालब्रम्हचारी हभप श्री श्याम सुंदर पुरी महाराज यांच्या हस्ते कळस बसविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी महाराजांचे प्रवचन होऊन महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.


देहरे गावाचे ग्रामदैवत श्री मालोबा-श्री बालोबा व श्री मांगिरबाबा यांचे दरवर्षी होळीसणाला मोठी यात्रा भरते.या यात्रेला भाविकांची मोठी मांदियाळी असते.
close