तेजप्रुथ्वी ग्रुपने इंदापूर पोलीस स्टेशन येथे पोलिस बांधवा समवेत केली भाऊबीज साजरी.
तेजप्रुथ्वी ग्रुपच्या वतीने पोलीस बांधवाना ओवाळून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
इंदापूर प्रतिनिधी: तेजप्रुथ्वी ग्रुपच्या वतीने ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा व महिला दक्षता समितीच्या सदस्या अनिताताई खरात यांच्यासह ग्रुपच्या महिला सदस्यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस बांधवाना ओवाळून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.अनिताताई खरात म्हणाल्या कि, आपल्या सेवेसाठी रात्रंदिवस दिपवाळी सण असतानाही आपले घरदार सोडून २४ तास ड्युटीवर हे माझे भाऊ आपले कर्तव्य बजावत आहेत. यांच्या जीवावर आपण आपली दिवाळी आनंदात साजरी करतो. मात्र हे माझे भाऊ दिवाळीपासून घरदार सोडून आपली राखण करतात अशा या माझ्या भावांसाठी आम्ही आज तेजप्रुथ्वी ग्रुप तर्फे आमची भाऊबीज पोलीस स्टेशन येथे माझ्या भावां बरोबर आनंदात साजरी करत आहे व परमेश्वराला अशी प्रार्थना करते की, माझ्या या सर्व भावांना सदैव निरोगी सदृढ व खुश ठेव व शासनालाही मी तेजप्रुथ्वी ग्रुपच्या माध्यमातून अशी विनंती करते की माझ्या पोलीस बांधवांना व त्यांच्या कुंटुबांना दिपवाळी साठी स्पेशल बोनस व स्पेशल दिपवाळी गिफ्ट द्यावे तसेच माझ्या पोलीस बांधवांना जी आपल्यासाठी २४ तास आपली सेवा करतात त्यांना शासनाने त्यांच्या सर्व सुखसोयी पुरवण्याचे हमी घ्यावी अशी मी शासनाला विनंती करते व दिवाळीनिमित्त माझ्या भावांना शुभेच्छा देते.
यावेळेस तेजप्रुथ्वी ग्रुपच्या महिला पदाधिकारी अनिताताई ताटे पोलीस काँन्सटेबल खंडागळे माँम ,गीतांजली होलगडे रेश्मा व्यवहारे व पोलीस स्टाफ व इतर महिला उपस्थित होत्या.

