shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिव्यांच्या झगमगाटाने आसमंत उजळला..!!

पावनधाम येथे अकरा हजार दिव्यांचा  दिपोत्सव; उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फिटले..!! 

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी:

आनंदाचा, प्रकाशाचा आणि मंगलमय सण म्हणजे दिवाळी होय. तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे संस्थान येथे दिपावली पाडव्या निमित्त अकरा हजार दिव्यांचा दिपोत्सव करण्यात आला. संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा वारकरी महामंडळाचे मराठावाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठ वर्षांपासून दिपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. 


याही वर्षी अकरा हजार दिव्यांच्या दिपोत्सव करण्यात आला.या प्रसंगी पंचक्रोशीतील महिलांनी सुबक रांगोळी रेखाटून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सायंकाळी सहा वाजता अकरा हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. दिव्यांच्या लखलखाटाने आणि फटाक्यांचा आतषबाजीने  मंदिर परिसर आणि आसमंत उजळून निघाले. उपस्थिती भक्तांना महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मुंदडा, काँग्रेसचे वसंतराव मोरे, पत्रकार बंधू यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ह.भ.प.जनार्धन महाराज चलवाड,अमोल महाराज,अशोक महाराज,शाम महाराज भिसे,हनुमंत सिरसाट महाराज, उत्तम पारेकर, गणपत पांचाळ, तुकाराम कापसे यांनी परिश्रम घेतले. 

मनोगत 
" मागच्या आठ वर्षांपासून पावनधाम येथे दिपावली पाडव्या निमित्त दिपोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी संत तुकोबाराय पावनधाम या संस्थानवर श्रध्दा असणार्या सर्व भक्तांचे सहकार्य लाभते. :- ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री, संस्थापक अध्यक्ष श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान.
close