shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा रुग्णालय अग्नितांडव तपास आता डॅशिंग ऑफिसर Dy S P संदीप मिटके यांच्याकडे सुपूर्त..!!


शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.

सोमवार ०८ नोव्हेंबर २०२१
अहमदनगर : शासकीय रुग्णालयातील आयसीयु विभागाला लागलेल्या आगीने महाराष्ट्रात खळबळ उडाली. अत्यंत गंभीर अन दुर्दैवी अशा घटनेने महाराष्ट्र ऐन दिवाळीत शोकसागरात बुडाला.
राष्ट्रीय नेत्यांनी देखील या घटनेची नोंद घेतली. या दुर्घटनेत अकरा जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक श्री संदीप मिटके , श्रीरामपूर विभाग ( अतिरिक्त कार्यभार – अहमदनगर शहर विभाग ) यांचे कडे वर्ग केला आहे. या सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल पूर्ण झाले.

यातून महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यावेळी 11 पैकी 6 जणांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

तर 4 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. त्यापैकी एका मृतदेहाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आलं आहे.
आता याचा तपास मिटके साहेबांकडे देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy S P संदीप मिटके हे करीत आहेत.

या घटनेनंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. अनेक नेते मंडळींनी या ठिकाणी भेट दिली आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close