शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह वृत्तसेवा:-
अमरावती :- आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे जागतिक एड्स दिन साजरा करतांना या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .
आज समाजामध्ये एड्स या रोगाबाबत बोलण्यासाठी सरासरी कोणी तयार होत नाही. हा रोग प्रसार होण्याच्या कारणापैकी एक कारण असलेले असुरक्षित लैंगिक संबंध हे आहे.आणी विशेष आपल्या समाजात आजही लैंगिक संबंध किंवा लैंगिक विषय या बाबत चर्चा केली जात नाही किंवा त्या प्रकारे आरोग्य शिक्षण किंवा मार्गदर्शन न मिळाल्याने या रोगाबाबत आणी लैंगिक विषयाबाबत अनेक गैरसमज आणी अज्ञान आहे. आणी हे अज्ञान ग्रामीण भागातील समाजात जास्त प्रमाणात आहे.
हेच अज्ञान दूर करण्याचा पर्यंत आरोग्य विभाग आरोग्य कर्मचाऱ्यां मार्फत करत असून हे अज्ञान दूर होऊन हा भयंकर रोग आपल्या समाजातून देशातूनशेवटी जगातून ज्या वेळी हद्दपार होईल त्याच वेळी खरा एड्स दिन साजरा होऊन आपण या रोगावर विजय मिळवू. अशा अनेक पैलूवरं स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्रकाश टाकला.
समाजात वावरतांना एड्सग्रस्त रुग्णांना मदत करणे, या रुग्णांप्रति असणारी तिरस्कारीची भावना नष्ट करणे हे समाजातील प्रत्येक सुजाण नागरिकांचे कर्तव्य आहे.वरील कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.बनसोड सर यांनी या वर्षीच्या जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य - असमानता संपवा,एड्स संपवा या घोषवाक्याचा अर्थ म्हणजे या रोगग्रस्त रुग्णांना आपल्या समाजात कुठेतरी वेगळं करण्याचा किंवा समाजापासून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो हा दुरावा दूर होऊन या रुग्णांना मदत करून मायेचा आपुलकीचा आधार देऊन आपण या रुग्णांप्रति असमानता संपवून,एड्स संपवू किंवा त्याला हरवू शकतो. हा मुद्धा आपल्या अध्यक्षीय भाषानातून स्पष्ट केला.वरील कार्यक्रमाच्या वक्तृत्व स्पर्धेत श्री.आत्राम,श्री.सोलापुरे,श्री.खंदारे, श्री.पोहरकर श्री.वैद्य यांनी भाग घेतला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.शिंदे यांनी करून कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन श्री.मुंडे यांनी केले.
वरील कार्यक्रमाला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर,मा.वैद्यकीय अधिकारी बनसोड सर व शिरसाठ सर ,पर्यवेक्षक मा.श्री.डोंगरे सर,देशमुख सर व सातपुते सर उपस्थित होते.

